मरू आई मंदिर ट्रस्ट समितीने घेतली आमदार भाई जगताप यांची भेट !
मरू आई मंदिर ट्रस्ट समितीने घेतली आमदार भाई जगताप यांची भेट !
मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार भाई जगताप यांची खारदांडा येथील खार दांडा गावठाण ट्रस्ट आणि मरू आई मंदिर समितीने भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले. या भेटीमध्ये ट्रस्टचे पदाधिकारी संदीप केमा, लक्ष्मण कोळी, सुनील माळी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून मुंबई काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदासाठी अनेकांनी आपली फील्डिंग केली होती. परंतु काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी आणि के. सी. वेणूगोपाळ यांनी तळागाळातील आणि कामगार वर्ग सक्षम असणारे नेतृत्व आमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमणूक करून मुंबई काँग्रेस मध्ये नवचैतन्य निर्माण केले. आमदार भाई जगताप यांनी आम्हाला नेहमीच मदत केली असून खार दांडा गावठाण वाचवण्यासाठी त्यांनी खूप उल्लेखनीय कार्य केले आहे. आज त्यांचा पक्षाने योग्य सन्मान केल्याबद्दल आम्ही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आणि आमदार भाई जगताप यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो अशी माहिती श्री. मरू आई मंदिर समितीचे पदाधिकारी संदीप केमा यांनी दिली. या समारंभात काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामगार वर्ग उपस्थित होता.