
फॅमिली वेल्फेअर एजन्सीच्या वतीने कोविड चाचणी शिबीर संपन्न !
फॅमिली वेल्फेअर एजन्सीच्या वतीने कोविड चाचणी शिबीर संपन्न !
आगाखान हेल्थ सर्व्हिसेस, प्रिन्स अली खान हॉस्पिटल, माझगाव व फॅमिली वेल्फेअर एजन्सी, लोअर परळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, लोअर परळ, बी डी डी चाळ येथे एजन्सीच्या कार्यालयात, कोविड १९ चाचणी, मधुमेह, डायबिटीस, मलेरिया, ब्लड प्रेशर, वजन-उंचीची तपासणी नुकतीच करण्यात आली.
फॅमिली वेल्फेअर एजन्सी, कामगार विभागात, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व ज्येष्ठांचे आरोग्य निरामय व्हावे या करिता एजन्सी प्रमुख - अल्पा देसाई यांच्या प्रयत्नाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रिन्स अली खान हॉस्पिटल (माझगाव), चे डॉ. अजिजा यारा खोत, पल्लवी बोरा व अर्चना द्विवेदी यांनी सर्व नागरिकांची तपासणी केली व मार्गदर्शन केले. विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासण्या करून घेतल्या.
एजन्सीचे प्रमुख अल्पा देसाई उपस्थित होत्या. शिबीर यशस्वी करण्यासाठी अनिता काकडे, रुपाली व्हटकर व सूर्यकांत कदम यांनी फारच मेहनत घेतली होती.