
किल्ले महोत्सव 2020 स्पर्धेत गुरुदत्त क्रीडा मंडळ सर्व प्रथम !
किल्ले महोत्सव 2020 स्पर्धेत गुरुदत्त क्रीडा मंडळ सर्व प्रथम !
शिवडी विधानसभा शिवसेना युवा सेनेच्या वतीने दिवाळीच्या कालावधीत मातीचे किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. परंपरा-संस्कृति अखंडित रहावी या हेतूने, किल्ले महोत्सव 2020 चे आयोजन केले होते. या स्पर्धेत गुरुदत्त क्रीडा मंडळ, इंडिया युनायटेड चाळ, परळ यांनी तयार केलेल्या (किल्ले लोहगड) हा देखावा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांक बाळ गोपाळ मंडळ परळ (किल्ले राजगड) व तृतीय क्रमांक अभ्युदय नगर, इमारत क्र. 12, काळाचौकी (किल्ले रायगड) यांना जाहीर झाला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ, नुकताच लालबाग येथील हनुमान मंदिर थिएटर येथे शिवसेनेचे उपनेते खासदार अरविंद सावंत, पश्चिम महाराष्ट्र समन्वक दगडूदादा सकपाळ, शिवडी विधानसभा आमदार अजय चौधरी, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी, व लता रहाटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमास सौ. श्रद्धा जाधव, सौ. सिंधू मसुरकर, अनिल कोकीळ, दत्ता पोंगडे, सचिन पडवळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम क्रमाकाचे पारितोषिक रोख रक्कम व छत्रपती महाराजांची रायगडावरील प्रतिकृती गुरुदत्त क्रीडा मंडळाच्या वतीने रुपेश तांबट, सचिन बाईत, सोहम कुणकावळेकर यांनी स्विकारले, स्पर्धेत एकूण ४२ मंडळांनी भाग घेतला होता.