‌‌हिंदी सक्तीची !! शिंदे गप्प का ?

‌‌हिंदी सक्तीची !! शिंदे गप्प का ?

     आम्ही हिंदू आहोत. हिंदी नाही. हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी जाहिर केले आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे हिंदीची पहिली पासून सक्ती करण्या आधी सर्व क्षेत्रात मराठी सक्ती करावी. मराठीचा बळी देऊन हिंदीची सक्ती करु नका. विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते. महाराष्ट्राची मातृ भाषा मराठी आहे. हिंदी सक्तीने लादणे म्हणजे मराठी भाषेवर अन्याय आहे. शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी हिंदी बाबतचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. अशा तऱ्हेने सर्वत्र हिंदी लादण्यावरून विरोध होत असताना हिंदी शिकणे जरुरी आहे. त्यामूळे हिंदी लोकांनी शिकली पाहिजे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अशा परिस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे प्रेरणा घेणारे आहोत.

        बाळासाहेबांचे विचार म्हणजे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणे. असे असताना हिंदीच्या सक्ती बद्दल सत्तेत बसलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प बसले आहेत. म्हणजे ज्याची खावी पोळी, त्याची वाजवाजवी टाळी अशी टीका होत आहे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम