भिमा तू चंदनापरी झिजविली बाबा काया !!

भिमा तू चंदनापरी झिजविली बाबा काया !!

भिमराया

भिमा तू चंदनापरी  झिजविली बाबा काया

भिमाई महामानवा  वंदनीय भिमराया


संविधान लिहिले तू   सावधान केले आम्हां

धम्माचा केला प्रसार  कोटी वंदन  हे तुम्हां

गौतमाचे ज्ञान जाणता  झाली तथागत छाया

भिमाई महामानवा वंदनीय भिमराया 


धम्मचक्र फिरे जगी  जननायक तू तारा

बाबू हरिदास बोले  जयभीम घोष नारा

धम्मदीक्षा दिली आम्हां  दीक्षाभूमी तूच पाया

भिमाई महामानवा  वंदनीय भिमराया


लेखणी तुझी  कमाल  न्याय स्वातंत्र्य समता

करूणेचा तू सागर  बोधीवृक्ष ही ममता

ते बुद्ध कबीर फुले  बोधीसत्व तूच माया

भिमाई महामानवा वंदनीय भिमराया !!


             गीतकार 

रानकवी जगदीप वनशिव पुणे

  मोबाईल नंबर 888841030


Batmikar
बातमीकार