
हवं ते घेऊन जा.... नको ते ठेऊन जा !!
हवं ते घेऊन जा,... नको ते ठेऊन जा उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद..
दिंडोशी विधानसभेचे समाजासाठी विधायक पाऊल
मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिंडोशी विधानसभा उपविभागात हवं ते घेऊन जा, नको ते ठेऊन जा या उपक्रमाचे आयोजन दिंडोशी विधानसभा उप विभाग अध्यक्ष व राजदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष - धनंजय पाणगुडे यांच्या संकल्पनेतून आयोजित केला असून या उपक्रमाला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
सारस्वत बँक जवळील, मनसे शाखा क्र ४० च्या शेजारी नागरी निवारा, गोरेगाव पूर्व येथे, दिंडोशी विधानसभा अध्यक्ष - भास्कर परब यांच्या हस्ते उदघाट्न झाले त्या वेळी मनसे विधानसभाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हा उपक्रम मागील ४ वर्षे राबवीत असून हे ५ वे वर्ष आहे. सर्व इय्यतेतील शालेय व महाविद्यालयातील पुस्तके विनामूल्य देऊन, गत वर्षीची जुनी पुस्तके घेण्यात येतात. हा उपक्रम शुक्रवार दि. ११ एप्रिल २०२५ पासून रोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरु आहे. पहिल्या दिवसा पासूनच पालक व विद्यार्थी यांची गर्दी असून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रत्येकाने जुनी पुस्तके वापरून, आपले शिक्षण पूर्ण केले असेल...... यामध्ये गरीब - श्रीमंत हा विषय नाही, किंवा कोणी नवीन पुस्तके घेऊ शकत नाही असंही नाही. पुस्तकाच्या किमती आपण पहातच आहोत, याचीच जाणीव आज आपल्याला व मुलांना असायला हवी म्हणून गेली चार वर्षे, मनसेच्या माध्यमातून 'हवे ते घेऊन जा..... नको ते ठेऊन जा'
या उपक्रमांचा मुलानी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक - धनंजय पाणबुडे यांनी केले आहे.
पानगुडे यांनी सांगितले की, आपल्या मुलांना दप्तरात नवी पुस्तके असावीत, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र, काहींची परिस्थिती अशी नाही. त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम गरजूंसाठी एक छोटी मदत ठरू शकतो.
उपक्रम ११ व १२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत पार पडला. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला असून सामाजिक जाणीव जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.