
गोरेगावात जागतिक योगादिन उत्साहात संपन्न !!
मुंबई : योग हा भारताचा प्राचीन व अनमोल वारसा आहे. शरीर, मन व आत्मा यांचा समतोल साधणारी विद्या आता जागतिक स्तरावर मान्यता पावली आहे. याच अवचित्य साधून अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व विसावा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या विद्यमाने जागतिक योगा दिन विसावा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.
अनिर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट च्या संस्थापिका - अंजली सरकाळे यांनी योग ही केवळ शारीरिक क्रिया नाही, तर जीवनाची एक कला आहे. शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन साधून आपण अधिक सकारात्मक, आरोग्यपूर्ण आणि समाधानी जीवन जगू शकतो व रोजच योगा करा असे उपस्थिताना मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ नागरिकांनी व योगा महिलानी योगाची प्रात्यक्षिते व प्रकार सादर करून मन व शरीर स्वस्थ कसे ठेवावे व आपले मानसिक संतुलन आणि आरोग्य याबाबतची माहिती दिली.
या सोहळ्यास अनिर्वेद च्या उपाध्यक्षा - अश्विनी बोरगावकर, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष - शैलजा बोन्द्रे, सावली परब, अश्विनी नाखरेकर, हळदणकर सर, विजय केसरकर, नंदकुमार खुळे व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिर्वेद ट्रस्ट आज पर्यंत अंध दिव्यांग यांना विविध उपक्रमातून आर्थिक मदत करीत असते. अंध दिव्यागं स्वप्नील कदम यांना धनादेश देऊन आर्थिक सहाय्य केले.