
भायखळा येथील रक्तदान शिबिरात नऊशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून इतिहास घडवला !
भायखळा येथील रक्तदान शिबिरात नऊशे पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून इतिहास घडवला !
कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार यामिनी य. जाधव यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नुकतेच चिंचपोकळी येथील नप्पू हॉल येथे करण्यात आले. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून नऊशे पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराच्या माध्यमातून 909 रक्ताच्या बॉटल्स जमा झाल्या असल्याची माहिती आयोजक शिवसेना आमदार यामिनी य. जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोना विरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासन स्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे मुखमंत्र्यांनी रक्तदानाचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला भायखळा विधानसभा मतदारसंघातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. या रक्तदान शिबिरात खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, शिवडी, वरळी विधानसभा संघटक सुधीर साळवी, नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष रमाकांत रहाटे, भायखळा विधानसभा अध्यक्ष विजय (दाऊ ) लिपारे, माजी नगरसेवक मनोज जामसुतकर, बबन गावकर आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.