
महाराष्ट्र राज्य लॉटरीचा खप वाढवा- मनोज वारंग, अध्यक्ष शिवसेना लॉटरी विक्रेता सेना !
महाराष्ट्र राज्य लॉटरीचा खप वाढवा- मनोज वारंग, अध्यक्ष शिवसेना लॉटरी विक्रेता सेना !
शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित लॉटरी आयुक्त श्री. ई. रवींद्रन यांची भेट घेऊन राज्यातील लॉटरी विक्रेत्यांच्या समस्यांचे प्रामुख्याने पोलीस, महानगरपालिकेपासून संरक्षण, महाराष्ट्र राज्याच्या ऑनलाईन लॉटरीची विचारणा आणि परराज्याच्या वाढत्या खाजगी पेपर लॉटऱ्यांमुळे राज्य पेपर लॉटरीची पीछेहाट झाली असून महाराष्ट्र राज्य लॉटरीचा खप वाढवा याबाबतचे विविध विषयांचे निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी शिवसेना लॉटरी सेनेचे अध्यक्ष, अंबरनाथ विधानसभेचे संपर्क प्रमुख मनोज वारंग, सरचिटणीस सिद्धेश पाटील व खजिनदार अविनाश सावंत उपस्थित होते.