भाजपा नगरसेविका सुरेखा रोहिदास लोखंडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा !

भाजपा नगरसेविका सुरेखा रोहिदास लोखंडे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा !

       भायखळा येथील भाजपा नगरसेविका सुरेखा रोहिदास लोखंडे यांचा वाढदिवस नुकताच सुंदर गल्ली येथील जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कामगार वर्गातील आणि विभागातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. तसेच विभागातील अनेक मंडळांनी, तरुणांनी आणि विविध सामाजिक संस्थांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

      आम्ही नेहमीच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असतो. कोरोनाच्या काळात देखील आम्ही विविध सामाजिक कार्य हाती घेतले असून गरजू नागरिकांना अन्नधान्य आणि मोफत औषधे  पुरविण्यात मदत केली आहे. महाराष्ट्र  राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आम्ही लवकरच विभागात अनेक रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करणार आहे. या शिबिरामध्ये  तरुणांनी , युवतींनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी केले. आम्ही विभागात अनेक सामाजिक कार्य करत असून महापालिका निधीतून विविध लोकोपयोगी कामे आमच्या प्रभागात केली आहेत. तरी मी विभागातील नागरिकांना विनंती करतो की आपली कोणतीही सामाजिक कार्य असतील तर आपण माझ्या सुंदर गल्ली येथील जनसंपर्क कार्यालयात येऊन भेटावे असे आवाहन भाजपा मुंबई उपाध्यक्ष, प्रभागसेवक रोहिदास लोखंडे यांनी केले आहे. या समारंभात समाजसेवक सचिन मुन्ना कुर्मी, भाजपा पदाधिकारी कमलेश डोके, अभिषेक अभंग, अख्तर नवाज कांबळे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week