
मलबार हिल शिवसेना आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
मलबार हिल शिवसेना आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
शिवसेना मलबार हिल विधानसभा मतदार संघाच्या वतीने खेतवाडी आश्रय हॉल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विभागातील नागरिकांनी युवकांनी आणि युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. या शिबिरातून 250 पेक्षा जास्त रक्त संकलन करण्यात आले आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता याबाबत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी रक्तदान करण्याचे आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देऊन शिवसेनेच्यावतीने दक्षिण मुंबई ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असतो रक्तदान हेच श्रेष्ठदान असे असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे. या रक्तदानामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो असे आवाहन शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी केले.
आम्ही विभागांत गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करतो. तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करतो. पण सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला रक्तसाठ्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी आम्ही हे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी सर्व नागरिकांनी यात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन माजी नगरसेवक अरुण दुधवडकर यांनी केली आहे. या शिबिरात युवा सेना विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ, हेमंत दुधवडकर, शाखाप्रमुख निलेश अहिरेकर, संकेत सावन्त, एनकेजीएसबी बँकेचे बँक अधिकारी साईश मंत्री, इतर सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.