
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रक्तसेवक प्रकाश नाडर यांचे केले कौतुक !
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रक्तसेवक प्रकाश नाडर यांचे केले कौतुक !
शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या वतीने प्रभादेवी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विभागातील नागरिकांनी युवकांनी आणि युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. या शिबिरातून 250 पेक्षा जास्त रक्त संकलन करण्यात आले आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता याबाबत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देऊन शिवसेनेच्या वतीन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आम्ही नेहमीच सामाजिक कार्य पुढे असतो रक्तदान हेच श्रेष्ठदान असे असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे. या रक्तदानामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो असे आवाहन नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केले. आम्ही विभागांत गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करतो. तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करतो. पण सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी आम्ही या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
सर्व नागरिकांनी यात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन नगरसेवक, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी केले आहे. या शिबिरात आमदार सदा सरवणकर, आमदार सचिन अहिर, आरोग्य समिती अध्यक्ष प्रविणा मोरजकर, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, नगरसेविका प्रीति पाटणकर, इतर सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.