
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी !
मागील दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना सोमवारी सकाळी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रिपरिप पावसाने हजेरी लावली. सकाळ पासून ढगांच्या गडगडाटाने देखील पावसाने वर्दी दिली. सोमवारची सकाळच ढगाळ वातावरणाने सुरू झाली. अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांची चिंता वाढवली आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यास बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.