महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या युट्यूब चॅनेलचे सोलापूर येथे उद्घाटन !

महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या युट्यूब चॅनेलचे सोलापूर येथे उद्घाटन !

       खो-खोचे आधारस्तंभ खासदार शरद पवार यांच्या वाढदिवस आणि खो-खो दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने स्वतःचे यू ट्युब चॅनल सुरु केले. याचे उद्घाटन सोलापूर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. या चॅनलच्या माध्यामातून खो-खो चे सामने, विविध कार्यक्रम क्रीडाप्रेमींना पहायला मिळणार आहेत.

     सोलापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी आमदार प्रणिती शिंदे, खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव आणि राज्य खो-खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा (नवनिर्वाचित खो-खो महासंघाचे सदस्य), राज्य संघटनेचे उपाध्यक्ष महेश गादेकर, क्रीडा उपसंचालक विजय संतान, महादेव कासगावडे, जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर, भाग्यश्री चिले, नगरसेवक चेतन नरोटे, भरत मेकाले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे,  आदी उपस्थित होते.

     याप्रसंगी अध्यक्ष संजीवराजे निंबाळेकर म्हणाले की खेळाडू, प्रशिक्षक, पंच व खो-खो प्रेमींना चांगल्या प्रकारे खेळाची माहिती मिळणार आहे. प्रसिध्दीही करता येणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे.

      खो-खो चा प्रचार व प्रसारात खासदार शरद पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे असे यावेळी डॉ. चंद्रजित जाधव म्हणाले. महाराष्ट्राच्या मातीत खो-खो रुजला, वाढला तो इंग्लडपासून दक्षिण कोरीयापर्यंत पोचला आहे. विविध देशांमध्ये खेळला जात आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे स्थान जागतिक स्तरावर राहील. त्यासाठीच सर्वांच्या चर्चेतून हे यु ट्युब चॅनल सुरु केले. कोरोनातील लॉकडाऊननंतर सर्वात मोठ्या पारितोषीकाची खो-खो लिग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे असेही डॉ. चंद्रजित जाधव यांनी जाहीर केले.  

      खेळ प्रत्येकापर्यंत पोचवण्यासाठी हे चॅनल निश्‍चितच प्रभावी ठरणार आहे. ही संकल्पना राबविण्यासाठी रत्नागिरीचे संदिप तावडे, राष्ट्रीय पंच नितीन कस्तुरे यांनी विशेष मेहनत घेतली आहे असे याप्रसंगी सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी संगितले.

      या कार्यक्रमासाठी अजित सांगवे, सत्येन जाधव, सुनिल चव्हाण, अजित शिंदे, राजाभाऊ शितोळे, श्रीरंग बनसोडे, उत्कर्ष न्यू सोलापूर, सन्मित्र, किरण स्पोर्टस् व सोलापूर तालुका खो-खो संघटनेचे पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.

      यु ट्युब चॅनल उद्घाटन प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, राज्य खो-खो संघटनेचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा, उपाध्यक्ष महेश गादेकर, श्रीकांत ढेपे, अर्जुन पुरस्कार विजेती सारिका काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी छायाचित्रात दिसत आहेत.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week