
राष्ट्रवादी काँग्रेस क्रिकेट सामन्याला उस्फूर्त प्रतिसाद !
राष्ट्रवादी काँग्रेस क्रिकेट सामन्याला उस्फूर्त प्रतिसाद !
दक्षिण मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या वतीने डोंगरी मैदान येथे भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय वाडकर उपस्थित होते यांच्या हस्ते विजेत्या टीमला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले यामध्ये एकूण बारा संघाने सहभाग घेतला होता यामध्ये अंतिम विजयी संघाला झाले असून त्यांना पुष्पगुच्छ श्रीफळ सन्मानचिन्ह आणि प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले.
आम्ही दरवर्षी माननीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमीत्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन असतो या वर्षी आम्ही 80000 बेरोजगार युवक-युवतींना रोजगार देण्याचे आव्हान केलेले आहे त्यानुसार आम्ही ठिकाणी ऑनलाईन भरती सुद्धा ठेवली आहे त्यातून अनेक व्यक्तींना रोजगार मिळणार आहे अशी माहिती दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष विजय वाडकर यांनी दिली. मी मेघवाल समाजाचा कार्यकर्ता असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला ही जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचे मी नक्कीच पालन करून पक्षाला मोठ्या प्रमाणात योगदान देऊन यापुढेही माझ्यातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, समाजसेवक विजय कोळी यांनी दिली. या समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सलिम खतीब आणि कार्यकर्ते उपस्थित होते.