श्री. स्वामी समर्थ कट्टाच्या वतीने कोविड व आरोग्य शिबीर संपन्न !

श्री. स्वामी समर्थ कट्टाच्या वतीने कोविड व आरोग्य शिबीर संपन्न !

       आगाखान हेल्थ सर्व्हिसेस, प्रिन्स अली खान हॉस्पिटल माझगाव, व श्री. स्वामी समर्थ कट्टा, आर्थर रोड नाका, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने, आर्थर रोड नाका येथील श्री. स्वामींच्या मठात कोविड १९, मधुमेह, डायबिटीस, मलेरिया, ब्लड प्रेशर, वजन-उंची ची तपासणी नुकतीच करण्यात आली.

         कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रिन्स अली खान हॉस्पिटल (माझगाव), चे डॉ. मो. रिजवान अन्सारी, डॉ. अजिजा यारा खोत, पल्लवी बोरा व अर्चना द्विवेदी यांनी सर्व नागरिकांची तपासणी केली व मार्गदर्शन केले. विभागातील नागरिकांनी, स्वामी भक्तांनी शिबिरात, कुटुंबासहित उपस्थित राहून तपासणी करून घेतल्या. 

     श्री. स्वामी कट्टा परिवाराचें अध्यक्ष - बाळ पंडित, सचिव - राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष - भास्कर साळुंके, सूर्यकांत नाचरे, आनंद पेवेकर, राजेश पालव, जगदीश सावंत व अशोक चाळके यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी फारच मेहनत घेतली होती.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week