वरळीच्या सुवर्णाची बीडीडी चाळ ते नासापर्यंत मजल !

वरळीच्या सुवर्णाची बीडीडी चाळ ते नासापर्यंत मजल !

       वरळी बीडीडी चाळीतील सुवर्णा कुराडे-चाळके यांची क्लाऊड कॉम्पुटिंग प्रकल्पासाठी अमेरिकेतील नासामध्ये नुकतीच निवड करण्यात आली,

        वरळी बीडीडी चाळीतील सुवर्णा कुराडे चाळके यांची शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन 'नासा' ने त्यांची क्लाऊड कॉम्पुटिंग प्रकल्पात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी निवड केली आहे.

       सुवर्णा यांचे वडील पोलीस खात्यात सेवेला होते. 

       बीडीडी चाळीत दहा बाय सोळा च्या घरात राहून त्यांनी पालिका शाळेतून शिक्षण घेतले. सन १९९५ मध्ये दहावीची परीक्षा ८८-14 टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर वांद्रे पॉलिटेक्निक मधून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. विवाहानंतर अमेरिकेत नोकरी करून कॉम्पुटर इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी अवघड अश्या वेगवेगळ्या सर्व्हर ओएस, सिस्को सर्टिफिकेट नेटवर्किंगचाही अभ्यासक्रम पूर्ण केला असून सद्या त्या क्लाऊड कॉम्पुटिंग सोल्युशन आर्किटेक्ट तज्ञ आहेत. 

        सुवर्णा यांची शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन 'नासा' ने त्यांची क्लाऊंड कॉम्पुटिंग प्रकल्पात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी निवड केली आहे.

         त्यांच्या या यशाबद्दल वरळी बीडीडी चाळ, वरळी विभागात तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून फार कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week