
स्नेहदा दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन !
स्नेहदा मासिकाचे हे विसावे वर्ष. नेत्रदान, अवयवदान, देहदान ही राष्ट्रीय गरज आहे. सामाजिक जाणिवेतून गेले द्विदशक प्रचार करणारे स्नेहदा मासिकाचे संस्थापक व संपादक - उमाकांत सावंत यांनी कोरोना महामारीतही मोठ्या जिद्धीने डॉ. हरीष पांचाळ, माजी आमदार - मंगेश सांगळे, प्रभात मित्र मंडळाचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते - सुरेश सरनोबत, प्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष व वृत्तपत्रलेखक - कृष्णा काजरोळकर यांच्याहस्ते स्नेहदा दिवाळी अंकाचे प्रकाशन, विक्रोळी येथील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळाच्या विरंगुळा केंद्रात नुकतेच संपन्न केले.
या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन कवी रामराजे यांनी केले. सुरवात विनायक पेवेकर गायक मंडळाच्या सुस्वर गायनाने झाली. मंगेश सांगळे आणि डॉ. हरीष पांचाळ यांनी देहदान, नेत्रदानाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. सूरेश सरनोबत, कृष्णा काजरोळकर, उमाकांत सावंत यांचीही समयोचित भाषणे झाली. यावेळी सर्वगोड, सकपाळ, विनोद साडविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.