विना सहकार नाही उद्धार आमदार भाई जगताप यांचे प्रतिपादन !

विना सहकार नाही उद्धार आमदार भाई जगताप यांचे प्रतिपादन !

         मुंबई काँग्रेस येथे नवीन सहकार सेलचे उद्घाटन नुकतेच आमदार भाई जगताप यांच्या हस्ते झाले. या समारंभात विविध पदाधिकाऱ्यांची पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली सहकार क्षेत्रातुन अनेक नेते घडले. पण त्यांनी सहकार क्षेत्र संपवण्याचा विडा उचलला आहे. आज जे नेते सहकारी क्षेत्रातून मोठे झाले तेच आज या सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहेत. सहकार वाचलं तर देश वाचेल या सहकार क्षेत्रातून अनेक विविध चळवळी निर्माण झाल्या आहेत. मी सहकार क्षेत्रासाठी वीस पंचवीस वर्षे खर्च केली असून कामगार क्षेत्रातही वीस वर्षे घालवली आहेत सहकार क्षेत्रातील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो.

       यापुढेही सहकार क्षेत्राचे अध्यक्ष भाई सावंत यांच्यासाठी हा कामगार नेता भाई जगताप सदैव तयार असेल मी तुम्हांला साथ द्यायला तयार आहे. अशी माहिती आमदार भाई जगताप यांनी आपल्या भाषणात दिली या समारंभात मुंबई काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष भाई सावंत, अभ्युदय बँकेचे संचालक संदीप घनदाट, मुंबई काँग्रेसचे खजिनदार संदीप शुक्ला आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week