श्री. स्वामी समर्थ कट्टाच्या वतीने संक्षिप्त श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे वाटप !

श्री. स्वामी समर्थ कट्टाच्या वतीने संक्षिप्त श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे वाटप !

       मुंबई. ना.म.जोशी मार्गावरील आर्थर रोड येथे श्री. स्वामी समर्थ कट्टा परिवारांच्या वतीने श्री. दत्तावधूत विरचित, संक्षिप्त गुरुचरित्र (श्री. दत्तलीलामृत - श्री. सिद्धलीलामृत) या ग्रंथाचे प्रकाशन व १०८ पोथीचे वाटप ऍड. चंद्रकांत नाईक यांच्या  हस्ते करण्यात आले. 

        "संक्षिप्त श्री. गुरुचरित्राच्या नित्य पठाणाने लाखो लोकांचे कल्याण झाले आहे. पोथी वाचनाने दिव्य अनुभव आलेले आहेत. तसेच पोथीच्या वाचनाने पूर्वजांचा उद्गार होतो. पूर्वजांचा उद्धार झाला की वंशजांच्या घरात सुखशांती नांदू लागते. वाचनाने पिशाच्च बाधेचा त्रास नाहीसा होतो. संक्षिप्त श्री. गुरुचरित्र वाचनास सुरुवात केल्यावर अनेक लोकांचे आजारपण व त्यांच्या सांसारिक अडचणी दूर झालेल्या आहेत. असे मत चंद्रकांत नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.

        चंद्रकांत नाईक यांच्या संकल्पनेतून व बाळ पंडित यांच्या प्रयत्नाने तसेच श्री. स्वामी समर्थ कट्टा परिवारांच्या सहकार्याने प्रकाशन व वाटप सोहळा संपन्न झाला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष - बाळ पंडित, चिटणीस - राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष - रवींद्र रेवडेकर, कार्याध्यक्ष - विनोद साळुंके, सह सूर्यकांत नाचरे, सागर मेस्त्री, जयसिंग परब, भरत येरम, चंद्रकांत आयरे, बाळकृष्ण बावधनकर, आदी स्वामी सेवक उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week