शिवसेना शाखा क्र 199 च्या वतीने नवरात्रो उत्सव मंडळांना सॅनिटायझर स्टँड, थर्मामिटर, ऑक्सिमिटर वाटप !!

शिवसेना शाखा क्र 199 च्या वतीने नवरात्रो उत्सव मंडळांना सॅनिटायझर स्टँड, थर्मामिटर, ऑक्सिमिटर वाटप !!

        शिवसेना युवासेना १९९ च्या वतीने पर्यटन, पर्यावरण आणि राज्यशिष्टाचार मंत्री-आमदार आदित्यजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या प्रयत्नाने तसेच शाखाप्रमुख - गोपाळ खाडये यांच्या सहकार्याने युवासेना वर्धापनदिना निमित्त प्रभागातील नवरात्रौ उत्सव मंडळास सॅनिटायझर स्टँड, थर्मामीटर, ऑक्सिमीटरचे वाटप प्रभाग 199 अंतर्गत सर्व नवरात्रो उत्सव मंडळांना करण्यात आले. 

        जे आर बोरीचा मार्ग, सातरस्ता, जेकब सर्कल येथे लक्ष्मी पूजा गणराज अपार्टमेंट येथे हा वरील उपक्रम राबविण्यात आला.

      त्यावेळी शाखाप्रमुख - "गोपाळ खाडये, महिला शाखा संघटक - प्रज्ञा आरोलकर, शाखा समन्वयक - रविंद्र कानडे, ग्रा. सं. कक्ष - सुजित नलावडे, विधानसभा समन्वयक -सचिन कांबळे, उपविभाग अधिकारी - प्रदीप पाटील, शाखा समन्वयक - साईकिरण सेपुरी, युवती शाखा अधिकारी - प्रियंका चौगुले, उपशाखाप्रमुख - राजेश बथवार, मच्छिंद्र घाटे, मारुती चव्हाण, गणेश लांबे, दौलत गजरे व राजेश मोरे तसेच युवासेनेचे मयूर कांबळे, अक्षय मोरे, गुरुदास कसलकर, ज्ञानेश्वर कासार, नितेश मानकर, आदित्य सातोसे, अविनाश दाभोलकर, प्रणव सकपाळ, सुरेंद्र पाटील, समृद्धी कोयंडे, तृप्ती कानडे, दिव्या बोरीचा आदी उपस्थित होते. तसेच युवाशाखा अधिकारी - मंगेश कुवेकर आदींसह युवासैनिकांनी विशेष मेहनत घेतली.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week