उत्कर्ष सेवा मंडळाचे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!

उत्कर्ष सेवा मंडळाचे संपूर्ण आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!

          मुंबई : उत्कर्ष सेवा मंडळ, मुंबई व युनिकेअर हेल्थ सेंटर, घाटकोपर यांच्या संयुक्त विद्यमाने ना.म.जोशी मार्गावर हरहरवाला बिल्डिंग येथे विनामूल्य संपूर्ण आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक उपचार शिबीर नुकतेच संपन्न  झाले.

            या शिबिरात नाडी तपासणी, रक्तदाब, मधुमेह, बी.एम.आय. व बॉडी फॅट आदींची विनामूल्य तपासणी करून सर्व नागरिकांना आहारा बाबत डॉक्टर सल्ला देण्यात आला. 

      शिबिरात युनिकेअर हेल्थ सेंटर चे डॉ. प्रशांत मोरे व राजेंद्र कदम सह अमोल बोराडे, उज्वला दिवेकर, सुस्मिता गावकर, भाग्यश्री साठे, किरण वाळुंज व अप्पासव यांनी सर्व नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केले. हरहरवाला बिल्डिंग व डिलाईल रोड परिसरातील असंख्य नागरिकांनी याचा लाभ घेतला.

     उत्कर्ष सेवा मंडळाच्या वतीने वैद्यकीय शिबिर प्रमुख - किशोर गावडे, श्यामराव चौगुले (अध्यक्ष), आनंत साळकर (उपाध्यक्ष), कृष्णा कदम (चिटणीस), सुधाकर कदम (कोषाध्यक्ष) तसेच सुरेश चव्हाण, अमोल पटेल, नरेंद्र पवार व आदित्य कदम यांनी फारच मेहनत घेतली.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week