
शिवसेना शाखा क्र.199 वतीने नागरिकांना आयुर्वेदिक किट वाटप !!
शिवसेना शाखा क्र.199 वतीने नागरिकांना आयुर्वेदिक किट वाटप !!
मुंबई: शिवसेना शाखा क्र.199 व राजा रामदेव आनंदीलाल पोद्दार वरळी केंद्रीय आयुर्वेदिय कँसर अनुसंधान संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर व शाखा प्रमुख गोपाळ खाडये यांच्या प्रयत्नाने ना. म.जोशी मार्ग, अपोलो मिल शेजारी, शिवसेना शाखा क्र.१९९ च्या कार्यालयाजवळ आयुर्वेदिक किट वाटप नुकतेच सलग तीन दिवस करण्यात आले.
कोरोनाच्या विषाणू पासून नागरिकांचे रक्षण व्हावे म्हणून आरोग्य तपासणी करून आयुर्वेदिक किटचे वाटप करण्यात आले. त्यात च्यवनप्राश, आयुष काढा, सासमन वटी, अनु तेल, साबण व मास्क इत्यादिंचा समावेश होता. याचा लाभ सुभाष नगर, आर ए बोरीचा मार्ग, सखूबाई मोहिते मार्ग, बी डी डी चाळ, ऑर्थर रोड येथील चार हजार नागरिकांनी घेतला.
या तीन दिवसीय किट वाटप कार्यक्रमात उप विभाग अधिकारी - प्रदीप पाटील, शाखा समन्वयक - रवींद्र कानडे, युवा शाखा समन्वयक - साईकिरण सेपुरी, युवती शाखाधिकारी - प्रियांका चौगुले, ग्राहक सरक्षणकक्ष - सुजीत नलावडे, युवाब्रिगेड - गौरव चव्हाण व शाखाधिकारी - मंगेश कुवेकर व शिवसैनिकानी फारच मेहनत घेतली होती.