प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि प्रशासनाचं दुर्लक्ष.......

प्लास्टिक पिशव्यांचा वापर आणि प्रशासनाचं दुर्लक्ष.......

      कोरनाचा  वाढता प्रभाव पाहता केंद्र व राज्य शासनाने जनतेसाठी अत्यावश्यक सेवेतील कडधान्य, भाजीपाला, दूध, रेशन इत्यादी सेवा सुरू करून दिली. शहर व ग्रामीण भागात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी अशी वल्गना गेल्या वर्षी पासून करण्यात आली. ४० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणा-याकडून दंडही वसूल केला. 

           कोरोनाचे विषाणू रोखण्यासाठी मार्केट बंद करून, गर्दी टाळण्यासाठी मोकळ्या जागेत भाजीपाला विक्री करण्यास परवानगी दिली. परंतु  भाजी, फळे विक्रेते व किरकोळ विक्रेते प्लास्टिक पिशव्याचा वापर करीत असल्याचे आजही बाजारात दिसून येत आहे.

           पोलीस, पालिका प्रशासन कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी युद्ध पातळीवर सज्ज आहे. पण व्यापारी प्लास्टिक पिशव्यांमधून माल विकत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गरजू व्यक्तींना व कंत्राटी कामगारांना धान्य, खाऊ इत्यादी वाटपासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.

       पावसाळा दोन महिन्यांवर आहे.   प्लास्टिक पिशवी वापरल्याने मुंबईची तुंबई होणार नाही ना याची दक्षता पालिका प्रशासनाने घ्यावी. नागरिकांनी वस्तू किंवा भाजीपाला, प्लास्टिक पिशव्यांमधून घेण्याचा मोह टाळावा.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week