
मुंबईकरांना दिलासा !
मुंबई कोरोनाशी प्रखर लढा देणाऱ्या राज्य सरकारला दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची चिंता वाढवणाऱ्या मुंबईतील संसर्ग हळूहळू कमी होत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन किंवा तीन अंकी आकड्यांमध्ये रुग्ण वाढ नोंदवणाऱ्या मुंबईतील बाधितांच्या संख्येत आज प्रथमच घट झाली आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत मुंबईत फक्त ६ नवे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात केवळ ३४ कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 2 हजाराच्यावर गेली असली तरी मुंबई समूह संसर्गाच्या टप्प्यात गेली नसल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. करोनाची लक्षणं असलेल्या नागरिकांवर तातडीनं उपचार करण्यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी ‘फिव्हर क्लिनिक’ सुरू केले आहेत. तिथं येणाऱ्या रुग्णसंख्येच्या आधारावर महापालिकेनं हा दावा केला आहे.