साहेब माझी मुलगी नर्स आहे !

साहेब माझी मुलगी नर्स आहे !

    आदरणीय आरोग्य मंत्री यांचा लेख वाचला आणि आपण किती काम व जनतेची सेवा करता.हे ही समजले.त्या बद्दल मी आपला आभारी आहे..

 साहेब माझी मुलगी नर्स आहे.. असे असंख्य पालक त्यांच्या मुली आहे .त्या करोना रूग्णांना सेवा देत आहे.

मला माझ्या सारख्या असंख्य पालकांना आजुबाजुच्या लोकांचा विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे... आम्ही काय करावे??..स्थानिक पोलीस आम्हाला व माझ्या सारख्या अनेक पालकांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करेल का.??

आमच्या सारख्या असंख्य पालकांना ही भीती वाटते.

लोक फक्त गरजे पुरतेच डॉक्टर, नर्स, पोलिस, सफाई कामगार ,देव मानतात.

पण पहा   ज्या वेळेस ती व्यक्ती कामातुन घरी आल्यावर आजुबाजुच्या नजरा व  बघण्याचा दृष्टीकोणात बदल जाणवू लागला आहे.. 

आणि नको त्या गोष्टी वरून भांडण उकरून काढू लागले आहेत...

जे लोक वीस वर्षे कधी भांडले नाही.ते आता जराशा कारणांमुळे भांडण काढत आहे..

फक्त आमची हीच चुक झाली माझी मुलगी व माझ्या सारख्या असंख्य पालकांच्या मुली जे समाजाच्या सेवा करत आहेत.. मला वाटते आम्हाला ही शिक्षा आहे...

  आपला त्रस्त नागरिक...

                    सुनील उमाकांत बेडे


Batmikar
वार्ताहर - सुनील बेडे

Most Popular News of this Week