
पोलिसांना तरी वेळेत मदत द्या !!
मुंबई पोलीस दलातील करोनाचा विळखा दिवसांन दिवस वाढत असल्याने, जे पोलिस बांधव समाजातील लोकांची सेवा देण्यासाठी दिवसरात्र जागता पहारा देत आहे. त्या पोलिस बांधवाची अडवणूक कधी साधी एम्बुलंन्स साठी करण्यात येते......तर कधी हाॅस्पीटल मध्ये जागा नाही... म्हणुन करण्यात येत आहे...
कुर्ला वाहतूक विभागातील ५७ वय वर्षे असलेले पोलिस कॉन्स्टेबल २० एप्रिल तापाने आजारी पडले होते. २१ एप्रिल रोजी राजावडी घाटकोपरच्या येथे नेले असता त्यांनी कस्तुरबा रूग्णालयात न्या असे सांगितले. कस्तुरबा रूग्णालयात नेलें असता. त्यांनी एडमिट करण्यास नकार दिला. व एकही बेड शिल्लक नाही. त्यांना नायर रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला दिला. तिथेही त्यांना हाच अनुभव आला..त्या रूग्णालयात ही त्यांच्यावर उपचारास नकार देऊन पुन्हा कस्तुरबा रूग्णालयात जाण्यास सांगितले.
ही माहिती वरिष्ठ अधिकारी श्री. रणदिवे यांना समजली. त्यांनी स्वताहा नियंत्रण कक्ष व इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून के.ई.एम. रूग्णालयात दाखल करण्यात यश आले. त्यातच उपचारा दरम्यान त्यांच्या मृत्यु झाला. कदाचित त्यांना वेळेवर रूग्णालयात दाखल करून घेतले असते तर कदाचित ते वाचले असते.. पण अहोरात्र सेवा करण्याची साठी अशी हेळसांड होऊ नये. अशी सामान्य जनाची अपेक्षा...व यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे....
सौजन्य - म.टा.