विषाची परीक्षा घ्यायची का ?

विषाची परीक्षा घ्यायची का ?

      ५ तारखेला रात्री ०९-०० वाजता घरातील दिवे बंद करून मेणबत्ती लावण्याची कल्पना सुरुवातीला चांगली वाटली. सध्या लाॅकडाऊनमुळे घरात राहून कोंडले गेलेल्या अनेकांच्या मनात एकाकीपणाची भावना निर्माण होऊन नैराश्य आले आहे. या एकाकीपणाचे विपरीत मानसिक परिणाम असंख्य व्यक्तींवर वेगवेगळ्या स्वरुपात होत आहेत. अशा स्थितीत "तुम्ही एकटे नाही, आम्हीही तुमच्या सोबत आहोत" हा संदेश त्या मेणबत्तीच्या प्रकाशामुळे सर्वांपर्यंत पोहोचून त्यांचा आत्मविश्वास दुणावू शकेल.

    (आपण ज्या सेक्युलर वाद्यांना "मेणबत्तीवाले" म्हणू़न हीणवत आलो  त्यांचेही "मेणबत्ती मार्च" अशाच उदात्त हेतूने काढले गेले काय? त्यांचेच अनुकरण आपले आदरणीय पंतप्रधान तर करीत नाहीत ना?) 

    परंतु या सार्वत्रिक मेणबत्ती ज्वाला प्रदर्शनाची दु्सरी काळी बाजू तंत्रज्ञानी मंडळींनी तांत्रिकदृष्टीकोनातून लक्षात आणून देताच हे मेणबत्ती प्रदर्शन नको असे वाटत आहे. एकाच वेळी देशभरातील सर्व दिवे मालवल्यास विद्युत् जनित्रांच्या कार्यक्षमतेत अचानक बिघाड होऊन देश काळोखात बुडू शकतो. तसे झाल्यास वीज वितरण थांबून व्हेंटिलेटरवर जिवंत असलेल्या अनेकांचे प्राण जाऊ शकतात. अनेकांच्या शस्त्रक्रिया अर्धवट थांबून त्यांचेही प्राण धोक्यात येऊ शकतात. अनेक कारखान्यांमध्ये उत्पादन यंत्रणा मध्येच अडकून उत्पादित वस्तूत आर्या होऊ शकते. तसे झाल्यास देशाचे आर्थिक नुकसान प्रचंड प्रमाणात होऊन जीवितहानी होऊ शकते, असा दावा केला जातोय.

    परंतु त्याप्रसंगी विद्युत यंत्रणेत योग्य ते फेरफार करण्याची काळजी घेतल्यास असे संकट टाळता येऊ शकते असाही दावा अनेक तज्ज्ञ करीत आहेत.

मग यातील नक्की कुणाचे खरे?

समजा, दुसऱ्या प्रकारचे दावा करणारे विद्युत यंत्रणेत योग्य वेळी योग्य ते बदल करण्यास अपयशी ठरले तर काय होईल?

विषाची परीक्षा घ्यायची का?

नकोच ती. सामान्य जनतेच्या जीवाशी प्रयोग करणे नको...

    तसेही समाजमाध्यमांच्या साहाय्याने आपला "भिऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत" हा संदेशही त्याचवेळी सर्वांपर्यंत पोहोचविणे शक्य आहे.

खरंच, सर्वांनी असाच संदेश त्याक्षणी सर्वत्र सेंड करावा.


Batmikar
जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत

Most Popular News of this Week