वरळीत प्रथमच बिर्याणी महोत्सव ! - Ruperi Worli

वरळीत प्रथमच बिर्याणी महोत्सव ! - Ruperi Worli

   मुंबई (वरळी) : युवतीसेना वरळी आयोजित व माजी आमदार - सुनिल शिंदे यांच्या विशेष सहकार्याने, वरळी येथील जाम्बोरी मैदान येथे दि. ६ ते ९ मार्च २०२० रोजी सायं. ५ ते रात्रौ १०-०० वाजेपर्यंत बिर्याणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

   बिर्याणी महोत्सवात शाकाहारी- मांसाहारी, ५० प्रकारच्या बिर्याणी खवय्याना पाहायला मिळणार आहेत. बच्चे कंपनीसाठी गेमिंम झोन असणार असून छोट्या मुलांना त्याचा आनंद घेता येणार आहे.

   तसेच अन्य खरेदीसाठी वीस स्टॉल, फूड कोर्ट व तिन्ही दिवस विविध मनोरंजनाचे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

           मुंबईतील नागरिकांनी बिर्याणी महोत्सवास एकदा भेट देऊन आनंद द्विगुणित करावा असे युवतीसेना वरळी यांनी आवाहन केले आहे.-Ruperi Worli


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week