समुद्र दिवाळी अंकास उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार !

समुद्र दिवाळी अंकास उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार !

  मराठी वृत्तपत्र लेखक संघ आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या दिवाळी अंक पारितोषिक वितरण सोहळ्यात समुद्र दिवाळी अंकास उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार, जे जे स्कूल ऑफ आर्ट चे प्रशासकीय प्राध्यापक - गजानन शेपाळ  यांच्या हस्ते, समुद्र अंकाचे संपादक - अशोक सावंत (लोअर परळ) यांना प्रदान करण्यात आला. 

           कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीदिनी, मराठी भाषा दिनाचे औचित्त साधून नुकताच, दादर पश्चिम येथील, दादर सार्वजनिक वाचनालय, धुरु हॉल येथे ४५ वा दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. 

         या सोहळ्याला प्रा. राहुल शेवाळे, प्रा. प्रवीण चोरमले, प्रा. गजानन शेपाळ, संघाचे अध्यक्ष - रवींद्र मालुसरे, प्र. कार्यवाह - प्रशांत घाडीगांवकर, माजी अध्यक्ष - विजय कदम  आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

       या सोहळ्यास संघाचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, पत्रलेखक, दिवाळी अंकांचे संपादक उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week