मनसे तर्फे पुस्तक प्रदर्शन व सवलतीच्या दरात विक्री !

मनसे तर्फे पुस्तक प्रदर्शन व सवलतीच्या दरात विक्री !

  मुंबई (लोअर परेल) महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंतर्गत वरळी विधानसभा, प्रभाग क्र. १९८ यांच्या वतीने, महाराष्ट्र भाषा दिना निमित्त रोज दि. २७ फेब्रु. ते १ मार्च 2020 या कालावधीत सकाळी 09 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत, तपोवन इमारती समोरील वाहनतळ, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (पश्चिम), येथे पुस्तक प्रदर्शन व सवलतीच्या दरात पुस्तक विक्रीचे आयोजन केले आहे.

     मराठी भाषा दिनाच्या औचित्त साधून, मराठी साहित्याचे वाचक वाढावे म्हणून पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात विविध ज्येष्ठ साहित्यिकांची प्रसिद्ध पुस्तके उपलब्ध असणार आहेत. 

         प्रदर्शन कालावधीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विभागातील वाचन प्रेमींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. असे मनसे विभाग अध्यक्ष संतोष धुरी व विभाग सचिव  उत्तम सांडव यांनी आवाहन केले आहे.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week