
मराठी भाषा गौरव दिन सोहळा !
मुंबई : मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई व दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन सोहळा गुरुवार दि. २७ फेब्रुवारी 2020 रोजी सायं. ठीक ६वा दासावा घुरू हॉल, छबिलदास रोड, दादर पश्चिम, मुंबई ४०००२८ येथे आयोजित केला आहे.
या सोहळ्यात ४५ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा व लेख स्पर्धांचा पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
प्रमुख पाहुणे खासदार राहुल शेवाळे, प्रा. गजानन शेपाळ (जे.जे.स्कूल ऑफ आर्ट) व प्रा.प्रवीण चोरमले उपस्थित राहणार आहेत. प्रा. चोरमले हे "मराठी भाषा आणि स्पर्धा परीक्षा" या विषयावर व्याख्यान देणार आहेत. मुंबई व मुंबई बाहेरील पत्रकार पत्रलेखकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे व दादर सार्वजनिक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह दत्त कामथे यांनी केले आहे.