
वस्तू व सेवा कर भवनात शिवजयंती उत्सव !
मुंबई : माझगाव येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने ३९० वा छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा, वस्तू व सेवा कर भवनातील शासकीय उपहारगृहात बुधवार दि. २६ फेब्रुवारी २०२० रोजी सायं. ठीक ५-०० वा. आयोजित केला आहे.
या सोहळ्यास राज्यकर आयुक्त संजीव कुमार हे अध्यक्षस्थान भूषविणार असून प्रमुख वक्ते म्हणून प्रतिथयश व्याख्याते व नामवंत कीर्तनकार प्रा. निलेश कोरंडे हे "छत्रपती शिवराय यांच्या चरित्रातून काय शिकावे" या विषयावर व्याख्यान देणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे प्रसिद्ध नाट्य-चित्रपट अभिनेते शंतनु मोघे व अतिथी विशेष राज्यकर आयुक्त परिमल सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक व मुख्य दक्षता अधिकारी वस्तू व सेवाकर विभाग, हे उपस्थित राहणार आहेत. तसेच वस्तू व सेवाकर विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थितीत असणार आहेत.
या शिवजयंती सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, उत्सव समितीचे सचिव- रोहिदास तरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.