
आयुष्यभर शिक्षण घेत रहा, शिक्षणा शिवाय माणूस मृत्यू समान आहे.
आयुष्यभर शिक्षण घेत रहा, शिक्षणा शिवाय माणूस मृत्यू समान आहे.
मुंबई: संत रोहिदास महाराज यांनी शिक्षणाचं महत्व ओळखले होते. शूद्रांनाज शिक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांच्यात अंधश्रद्धा व न्यूनगंड निर्माण होतो, आणि शिक्षणा शिवाय ते दूर करणे अशक्य होते. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मानसिक अवस्था चांगली राहून मन प्रसन्न होते. शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार सर्वानाच आहे. असे शिक्षण घ्या की, त्याच्यात सत्यअसेल. आयुष्यभर शिक्षण घेत रहा. शिक्षणा शिवाय माणूस हा मृत्यू समान आहे. असा उपदेश संत रोहिदास यांनी समाजाला दिला.
रोहिदास समाज पंचायत संघ, डिलाईल - करिरोड विभाग क्र. २ यांनी संत रोहिदास महाराज जयंती निमित्ताने, संत रोहिदास यांच्या आध्यात्मिक व सामाजिक क्रांतिकारी विचाराचे चरित्र तरुण पिढीला व्हावे म्हणून चित्र रुपी प्रदर्शन, लोअर परेल (पश्चिम) येथील, बी डी डी चाळ क्र. २६ व २७ जवळ, श्री हनुमान मंदिर, मुंबई ४०० ०१३, येथे आयोजन केले होते.
प्रदर्शनाचे उदघाटन समाजसेवक सुभाष चिपळूणकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे मयूर देवळेकर, संदीप आंबोकर, पंचायत संघाचे अध्यक्ष राजाराम सावर्डेकर, किरण विनकर, आनंद गिम्हवणेकर, आनंद कदम , सूर्यकांत भेलेकर, रत्नमाला चिपळूणकर, सपना बसनकर, अश्विनी प्रभूळकर, सुलेखा मेढेकर, आदी पंचायत संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रस्तावना आनंद कदम यांनी केले व आभार किरण विनरकर यांनी मानले.