शासन निर्णया विरोधात ठाण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे आंदोलन !!

शासन निर्णया विरोधात ठाण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे आंदोलन !!

      १५ मार्च 2024 च्या शालेय शिक्षण विभागाच्या जाचक शासन निर्णया विरोधात ठाण्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे आंदोलन !!

         प्रतिनिधी - १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक पदे कमी होणार आहेत. त्यामुळे मराठी, हिंदी, उर्दू व इतर शाळांना सर्व विषयांना योग्य न्याय देऊन गुणवत्ता टिकविणे अतिशय कठीण होणार आहे. या नव्या शासन निर्णयाचे शिक्षण क्षेत्रावर होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा विधानपरिषद आमदार श्री ज. मो. अभ्यंकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार शिक्षक सेना ठाणे जिल्हा व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे  माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या बीजे हायस्कूल ठाणे येथील कार्यालयासमोर 27 फेब्रुवारी च्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून तीव्र आंदोलन करण्यात आले.

       त्यावेळी ठाणे जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष केदार दिघे, नरेश मनेरा, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण अध्यक्ष जगदीश, सरचिटणीस मारुती पडळकर, संतोष गायकवाड, भगवान गावडे, कुलदीप पाटील, दिलीप चौधरी, प्रकाश फर्डे, शोभा गरंडे, राजेंद्र पवार, उदय कदम, विजय निकम, राजेंद्र शिंदे, संजय खैरनार, विजय हिलिम, वैभव कदम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब पक्षाचे) जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, राजेंद्र महाडिक, आकांक्षा राणे, प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, विभाग प्रमुख प्रशांत सातपुते, हेमचंद्र राठीवडेकर, व्यंकट कांबळे, पप्पू अठवाल, रुपेश जाधव प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने  शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 च्या निकषांचे पालन होऊन संचमान्यता निकषांमध्ये सुलभता यावी यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष शिक्षणाच्या मूलभूत प्रश्नांकडे वेधण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उभारण्याचे आदेश शिक्षक आमदार ज.मो. अभ्यंकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week