गडकिल्ले व रांगोळी स्पर्धेचे निकाल जाहीर...

गडकिल्ले व रांगोळी स्पर्धेचे निकाल जाहीर...

     मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्या वतीने दीपावली   महोत्सव २०२४ च्या निमित्ताने, बारा इमारती अंतर्गत, गडकिल्ले व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचा निकाल परीक्षकांनी जाहीर केला.

      गडकिल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक -विद्या संकल्प (पन्हाळ गड), प्रतिभा संकल्प (पन्हाळगड) द्वितीय क्रमांक, व विनय संकल्प (प्रतापगड) हे तिस-या क्रमांकाचे मानकरी ठरले. उत्तेजनार्थ -ममता संकल्प (रायगड), विश्वास संकल्प (सिहंगड) व विवेक संकल्प (सुवर्णगड) यांना जाहीर केले.

       रांगोळी स्पर्धेत प्रतिभा संकल्प यांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक - समता संकल्प  व तृतीय क्रमांक विवेक संकल्प याना जाहीर झाला. उत्तेजनार्थ, विश्वास संकल्प, ममता संकल्प व ऊर्जा संकल्प यांना देण्यात आली.

        स्पर्धेचे परीक्षण - निनाद पाटील, भूषण उदगिरकर व विनय वैद्य यांनी केले.

         संस्थाचे पदाधिकारी - चंद्रकांत माने, धनंजय पानबुडे, हनुमंत सुळे, राहुल गांगुर्डे, अजय पवार, सुबोध महाडिक व रामचंद्र घुरी यांनी सर्व सभासदाचे व रहिवाशी यांचे आभार व्यक्त करून दीपावली च्या शुभेच्छा दिल्या.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week