शिवसेनेची (ठाकरे) शिक्षणाधिकारी ठाणे यांच्याशी सहविचार सभा !!
शिवसेनेची (ठाकरे) शिक्षणाधिकारी ठाणे यांच्याशी सहविचार सभा !!
शुक्रवार, दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांसोबत ठाणे जिल्हा शिवसेना (उबाठा) अध्यक्ष केदार दिघे यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. चर्चेमध्ये संच मान्यता वेळेत मिळणे, संचमान्यता दुरुस्त्या निर्धारित वेळेत करणे, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर मान्यता, शालार्थ प्रस्ताव, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती, कनिष्ठ महाविद्यालयीन अर्धवेळ व घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या नियुक्त्या, माध्यमिक शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिका व अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक समस्या अशा अनेक विषयांचा समावेश होता. यामध्ये शिक्षणाधिकारी स्तरावर असलेल्या कामांचा शीघ्रगतीने निपटारा करण्याबाबत दिघे यांनी मा. शिक्षणाधिकारी यांना सकारात्मक चर्चेअंती सांगितले. यावेळी मारुती पडळकर, विलास आंग्रे,भगवान गावडे, कुलदीप पाटील, शुभांगी निचीते, दिलीप चौधरी, तुकाराम खाटेघरे, राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या सभेस शिवसेना (उबाठा) गटाचे अनेक कार्यकर्ते व महाराष्ट्र शिक्षक सेना ठाणे माध्यमिक विभागाचे जिल्हा व तालुका कार्यकारणीतील पदाधिकारी व शिक्षक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यातबाबत अश्वस्त केले.
यापुढेही शिक्षण विभागातील कोणत्याही समस्या असल्यास संबंधितांना केदार दिघे यांची सक्रिय मदत होणार असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे यांच्या पदाधिकाऱ्यांना समस्याग्रस्त कर्मचाऱ्यांनी संपर्क साधावा असे आवहान शिक्षक सेनेतर्फे करण्यात आले.