
प्रजासत्ताक दिनी महिलांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे !
प्रजासत्ताक दिनी महिलांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे !
मुंबई: संचालक, नागरी संरक्षण दल व महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांच्या विचार सरणीतून, सरकारी अधिकारी-कर्मचारी, शाळा महाविद्यालयीन शिक्षक-विद्यार्थी, मुंबई शहरातील गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशी, यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन व प्रथोमाचार विषयीची जनजागृती विभागा तर्फे केली जाते.
प्रजासत्ताक दिना निमित्त, नागरी क्षेत्र-1, बृहन्मुंबई व परळ येथील खटाव बिल्डिंग यांच्या संयुक्त विद्यमाने, इमारती मधील रहिवाश्याना "स्वतःचा जीव वाचवून, इतरांचा जीव कसा वाचवावा" या बाबत व्याख्यान आयोजित केले होते.
नागरी संरक्षण क्षेत्र-1, चे, सहायक उप नियंत्रक- बा.आ. मंगसुळे, यांनी दैनंदिन जीवनातील संभाव्य धोके, आग,अतिवृष्टी, पूर, भूकंप यावर तीन तास व्याख्यान दिले तसेच प्रात्याक्षिके करून दाखविली. घर, ऑफिस, रस्त्यात मानव निर्मित अथवा निसर्ग निर्मित घटना घडली तर त्यावेळी परिस्थिती कशी आटोक्यात आणावी, या बाबत सविस्तर माहिती दिली. असंख्य महिलांनी घरगुती ग्यास सिलिंडर कसे वापरावे यावर प्रश्न व शंका उपस्थित केल्या. श्री. मंगसुळे यांनी समर्पक उत्तरे दिली.
या कार्यक्रमास पत्रकार-बाळ पंडित, खटाव बिल्डिंगचे पदाधिकारी- महेश लाड, समीर लहाने, भाई सावंत सह भावना ममनिया व आशा फोडेकर व असंख्य रहिवाशी उपस्थित होते. संपूर्ण आयोजन सुनील पांचाळ-मसुरकर यांनी केले होते.