
हिंदू नव वर्षा निमित्त ज्येष्ठ महिलांचा मेळावा !!
मुंबई: लोअर परेल (पूर्व) येथे इनरव्हील क्लब व फॅमिली वेल्फेअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने, हिंदू नववर्षा निमित्त, ज्येष्ठ महिलांचा मेळावा, बिडीडी चाळ येथील फॅमिली वेल्फेअर कार्यालयात संपन्न झाला.
उपस्थित ज्येष्ठ महिलांना हळद कुंकू, भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा - भारती विकमसी, सचिव - जागृती नागडा व फॅमिली वेल्फेअर सेंटरच्या अल्पा देसाई यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन करून आरोग्याची काळजी घ्यावी असे सुचविले.
जादुगार श्याम यांनी जादूचे प्रयोग करून सर्वांचे मनोरंजन केले. ज्येष्ठ महिलांनी भजन, भारुड व विविध गाणी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - अनिता काकडे व रुपाली वटकर यांनी केले.