
शिवजयंती उत्सवात ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान !
मुंबई: राजदिप प्रतिष्ठान वतीने शिवजयंती उत्सव, गोरेगाव (पूर्व) येथे नागरी निवारा परिषद, सारस्वत बँके जवळ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष - धनंजय पाणबुडे यांच्या हस्ते शिवरायाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, उपाध्यक्षा - सुनिता चव्हाण सह महिला सभासदांनी पंचारती करून पूजा केली. ' जय भवानी, जय शिवाजी ' च्या जल्लोषात घोषणा देऊन छ. शिवाजी महाराजा वर पुष्पवृष्टी करण्यात आली. उपस्थित ज्येष्ठांचा व निमंत्रीतांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक - अँड भास्कर परब, सल्लागार - अजय सावंत, व्यवस्थापक - राकेश मोरे व उत्सव समिती चे पदाधिकारी - संजय लब्दे, अतिश अमरे, अथर्व सावंत, सुबोध महाडिक सह सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तसेच दिंडोशी, नागरी निवारा, संकल्प सोसायटी, संतोष नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.