गोरेगाव येथे संकल्प माघी गणेश उत्सव उत्साहात संपन्न !!

गोरेगाव येथे संकल्प माघी गणेश उत्सव उत्साहात संपन्न !!

     गोरेगाव पूर्व येथील, संकल्प सहनिवास फेडरेल सोसायटीच्या वतीने 15 वा माघी गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.

        पहाटे पासून गणेश अभिषेकास सुरुवात झाली. गणेश याग व होम हवन, अथर्व शीर्ष पठन करण्यात आले.

    दुपारी गणेश जन्म सोहळा संपन्न झाला, त्यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या  होत्या.

      सत्यनारायण पुजे नंतर सोसायटीत ढोल ताशाच्या व गणपती बाप्पाच्या गजरात पालखी काढण्यात आली.

       सकाळ पासून नागरी निवरा, संतोष नगर, गोकुळधाम, वाघेश्वरी, म्हाडा वसाहतीतील असंख्य गणेश भक्तांनी गणेश दर्शन करून घेऊन महाप्रसादाचा  लाभ घेतला.

        संकल्प फेडरेल सोसायटी, सांस्कृतिक मंडळ व महिला मंडळाचे मुख्य पदाधिकारी, चंद्रकांत माने, हनुमंत सुळे, राहुल गांगुर्डे, अजय पवार, ज्योती माने, मनिषा अमरे यांच्या आयोजनाने व सर्व सभासदाच्या, अहोरात्र प्रयत्नाने गणेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week