
गणपती विसर्जनात भक्तांना मोफत पुरी-भाजी व पाणी वाटप !!
गणपती विसर्जनात भक्तांना मोफत पुरी-भाजी व पाणी वाटप !!
मुंबई : चिंचपोकळी (पश्चिम) येथील श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने आर्थर रोड परिसरातील गणेश दर्शनासाठी गणेश भक्तांना मोफत पुरी-भाजी व पाणी चे वाटप करण्यात आले.
आर्थर रोड वरून लालबाग परळ चे सर्व सार्वजनिक गणपती, गिरगाव चौपाटीवर विसर्जनाला जातात. विरार, ठाणे, डोंबिवली व उपनगरातील नागरिक गणेश दर्शनासाठी आर्थर रोड येथे येतात. त्यांची गैर सोय होऊ नये या करिता, श्री स्वामी कट्टा परिवाराच्या वतीने सर्वासाठी मोफत भाजी-पूरी व पाण्याची सोय करण्यात आली.
कट्टा परिवाराचे सचिव- राजेंद्र चव्हाण सह बाळ पंडित, रवींद्र रेवडेकर,भास्कर साळुंके, जनार्दन देसाई, नितीन रोमन, आनंद पेवेकर, राजेश पालव, संतोष रेवडेकर, जगदीश सावंत व महिला स्वामी सेवकांनी विशेष मेहनत घेतली. याचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.