
तरूण उत्साही सेवा मंडळाचा, श्री माघी गणेशोत्सव २०२३ संपन्न !!
तरूण उत्साही सेवा मंडळाचा, श्री माघी गणेशोत्सव २०२३ संपन्न !!
मुंबई लोअर परेल पूर्व येथील बी डी डी चाळ २७ व ३२ च्या प्रांगणात तरुण उत्साही सेवा मंडळाचा माधी श्री गणरायाची स्थापना झाली. या सहा दिवसाच्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे मंडळाने केले होते.
रोज गणेश पूजा, हवन, आरती, महाप्रसाद, तसेच विवाहित महिलांसाठी- श्री तशी सौ, सर्व महिलांसाठी फॅन्सी ड्रेस गरबा, बाल गोपाळासाठी विविध स्पर्धा इत्यादी अनेक स्पर्धाचे आयोजन मंडळाने केले होते.
गणेश भक्तांसाठी रोज महाप्रसादाची व्यावस्था करण्यात आली होती. ढोल ताष्याच्या गजरात श्री चे आगमन व विसर्जन करण्यात आले. त्यात मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विभागातील सर्व गणेश भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.