
जागृती मंच आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा !
मुंबई: करिरोड पश्चिम येथील जागृती मंच यांच्या वतीने स्पर्धा महोत्सव अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवार दि. २९ जानेवारी २०२३, सायंकाळी ४.०० वा. श्रमिक जिमखाना, ना म जोशी मार्ग महानगर पालिका शाळेजवळ, करिरोड पश्चिम, लोअरपरेल (पूर्व) मुंबई ४०००१३ येथे केले आहे.
स्पर्धा पहिली व दुसरी १ ला गट, तिसरी ते चौथी २ रा गट व पाचवी ते सहावी ३ रा, सातवी व आठवी ४ था गट, ९ वी व १० वी ५ वा गटात विभागली आहे.
प्रत्येक गटात तीन पारितोषिके व उत्तेजणार्थ दोन याप्रमाणे भेट वस्तू व सन्मान चिन्हे देण्यात येणार आहेत.
२ ते ५ गटाती विद्यार्थीनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील एखाद्या प्रसंगावर आधारित चित्र रेखाटायांचे आहे. गट क्र १ च्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील एखाद्या प्रसंगावर चित्र देण्यात येईल. ते त्यांनी त्यांच्या शैलीत रंगवायचे आहे.
स्पर्धेच्या ठिकाणी नोंदणी केली जाईल. विध्यार्थीना संस्थेकडून पेपर दिला जाईल, मात्र अन्य साहित्य विद्यार्थ्यांनी स्वत: आणायचे आहे.
या चित्रकला स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थीनी सहभागी व्हावे असे आवाहन, मुंबई वृत्तपत्र विक्रेता महा संघाचे विश्वस्त- जीवन भोसले यांनी केले आहे.