
पालिका रुग्णवाहिनी यानगृहात रक्तदान केलेल्या कर्मचा-याचा भव्य सत्कार !
पालिका रुग्णवाहिनी यानगृहात रक्तदान केलेल्या कर्मचा-याचा भव्य सत्कार !
मुंबई : चिंचपोकळी पश्चिम येथील, पालिका रुग्णवाहिनी यानगृहात आयोजित केलेल्या, रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या अधिकारी -कर्मचा-याचा भव्य सत्कार, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अधिकायांच्या हस्ते भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.
यानगृहात कर्मचा-याचा वार्षिक मेळावा व पूजेचे आयोजन केले होते. या सोहळ्यास मुख्य लेखा परीक्षक-सिताराम काळे, सह आयुक्त-अमित कुमार, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता-मोहन जोशी, कूपर रुग्णालय अधिष्ठाता- शैलेश मोहिते, कायदा अधिकारी- सुनील सातवणे, आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या-रश्मी लोखंडे, इ- विभाग सहायक आयुक्त-अजय कुमार यादव सह सुधीर परकोळ, शैलेश म्हात्रे, सुनील सावंत, सुरज पवार, मालोजी कोले व अशोक जाधव आदि अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यानगृह व भोलानाथ मंदिर फुलांनी- रोषणाई करून सजविण्यात आहे होते. यान गृहातील कर्मचा-यांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम केले.
श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने "स्वामी गीत माला" बहारदार स्वामी गीते सादर केली.
पूजा समिती अध्यक्ष-प्रकाश जेधे, सचिव-श्रीकृष्ण खोडके, कोषाध्यक्ष-धनंजय सोरटे, मनीष झोरे, संपत डोंगरे व हितसिंग राठोड, एकनाथ शिर्के, गजानन घाग, राजेंद्र चव्हाण व राकेश आचरेकर यांनी फारच मेहनत घेतली होती. सूत्रसंचलन - गोपीनाथ कुंदे यांनी केले.