सावंतवाडी संस्थानचे ९४ वे स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न !

सावंतवाडी संस्थानचे ९४ वे स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न !

         मुंबई : सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचे ९४ वे वार्षिक स्नेहसंमेलन व  विद्यार्थी गुणगौरव सोहळा, दादर येथील संस्थेच्या मराठा वैभव समाजगृह-नाना साहेब सावंत सावंत सभागृह, स्टार मॉल, येथे संस्थेचे अध्यक्ष- इंद्रजित सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. 

      सोहळ्यास प्रमुख आथिती सिंधुदुर्ग सहकारी बँकेचे अध्यक्ष- हरीश परब व डॉ. स्वेता इंगळे- सरकार उपस्थित होते. तसेच विश्वस्त- दिवाकर दळवी, डॉ. बापूजी सावंत, राजेंद्र देसाई, विश्वनाथ सावंत, सतिश सावंत कार्याध्यक्ष- शशिकांत गावडे, सरचिटणीस-प्रभाकर परब, चिटणीस- अनुश्री माळगावकर, व कोषाध्यक्ष- किशोर सावंत व्यासपीठावर उपस्थित होते.

        कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक- नानासाहेब सावंत यांच्या प्रतिमेस, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व  दीपप्रज्वलन करून केली. 

      स्वागताध्यक्ष l- अनुश्री माळगावकर  यांनी पाहुण्याचे स्वागत करून, प्रमुख अतिथी- हरीश परब व डॉ. स्वेता इंगळे सरकार यांचा इंद्रजित सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेची माहिती - सतीश सावंत यांनी दिली. 

    650 गड किल्ल्यांचा इतिहास संशोधन केलेल्या दुर्ग महर्षी- आप्पासाहेब परब याना संस्थेचे सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ अध्यक्ष -इंद्रजित सावंत यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दिलीप सावंत यांना पत्रकारितेतील उज्वल यशाबद्दल सत्कार करण्यात आला.

         उपस्थित मान्यवरांच्या हस्ते १० वी, १२ वी व पदवीधर व द्विपदवीधर विद्यार्थीना प्रशस्तीपत्र-रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

       उपस्थित प्रमुख पाहुण्यानी व संस्थेचे अध्यक्ष- यांनी उपस्थित ज्ञाति बांधव व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

       कार्यक्रमाचे सुत्र संचालन- किशोर सावंत, प्रस्तावना-प्रभाकर परब, पारितोषिक सूत्र- राजेंद्र परब व आभार महादेव दळवी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र सावंत, सीताराम दळवी व विजय (बाळ पंडित) यांनी विशेष मेहनत घेतली. सुरुवातीस "स्वामी" संस्थेचा वाद्यवृद कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्याततील मराठा  ज्ञातीबांधव व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week