
श्रद्धा संकल्प वार्षिक महोत्सव संपन्न !
गोरेगाव पूर्व येथील श्रद्धा संकल्प सहपरिवारा च्या वतीने, श्रद्धा संकल्प च्या प्रांगणात क्रीडा महोत्सव संपन्न झाला. सात दिवस झालेल्या उत्सवात, कॅरम, क्रिकेट, बुद्धीबळ, हॉली बॉल, इत्यादी स्पर्धेचे आयोजन केले. ३१ डिसेंबर रोजी जल्लोष उत्सव साजरा केला. विजेत्या स्पर्धकांना, पारितोषिके देण्यात आली. खाद्य महोत्सवात विविध खाऊ चे स्टॉल ठेवण्यात आले होते, सेल्फी पॉईंट, विद्यूत रोषणाई करुन आनंद उत्सव साजरा केला. प्रथमच ऑनलाइन प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात असली. सात दिवस चालू असलेल्या उत्सवात महिलांचा सहभाग मोठा होता.
श्रद्धा संकल्पचे अध्यक्ष- सुनील गोरड, चिटणीस-राहुल गांगुर्डे, चंद्रकांत माने सह मुकेश सुर्वे, हिमांशू खोत, दिलीप मोहिते, किरण इलग, समीर कर्णिक, योगेश साबळे, नंदकुमार मांजरेकर आदीचे सहकार्य लाभले.