
श्री पंत महाराज बाळेकुंद्री पालखी सोहळा उत्साहात संपन्न !
श्री पंत महाराज बाळेकुंद्री पालखी सोहळा उत्साहात संपन्न !
मुंबई : करि रोड पश्चिम येथील, श्रीपंत भक्त मंडळ यांच्या वतीने दत्त जयंती निमित्ताने भव्य श्रीपंत महाराज बाळेकुंद्री पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
करी रोड येथील श्री दत्त मंदिर, शिवकृपा इमारत येथे पालखी सोहळा सुरू करून बी.डी.डी.चाळ, ना.म. जोशी मार्गे चिंचपोकळी पश्चिम येथील अपोलो मिल दत्त मंदिर येथे नाम स्मरण, महाआरती भजन करून विसर्जीत करण्यात करण्यात आला. ठीक ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. सदाशिव (भाऊ) भोसले व आण्णा भजन मंडळाचे भक्त पालखीत सहभागी झाले होते. हजारो भक्तांसाठी प्रसादाचे आयोजनही केले होते.
श्रीपंत भक्त मंडळाचे अध्यक्ष-महेंद्र भोसले, सचिव -भीमराव तिप्पे, कोषाध्यक्ष -विश्वनाथ दाकवे सह पंत भक्तांनी शिस्तबद्ध पालखीचे आयोजन केले होते.