
अपोलो मिल दत्त भक्त मंडळाच्या वतीने ५० वी दत्त जयंती संपन्न !!
अपोलो मिल दत्त भक्त मंडळाच्या वतीने ५० वी दत्त जयंती संपन्न !!
चिंचपोकळी पश्चिम येथील अपोलो मिल दत्त भक्त मंडळ यांच्या वतीने ५० वे दत्त जयंती उत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात संपन्न झाला. सन १९७२ मध्ये अपोलो मिल मधील अधिकारी-कामगारांनी या दत्त मंदिरा ची स्थापना केली. हे मंदिर जागृत असून भक्तांची अजूनही भक्ती व श्रद्धा आहे, या बाबतचे अनुभवही दत्त भक्तांनाआलेले आहेत.
सकाळी ५-०० वा काकड आरतीने दत्त जयंती सुरू झाला, नाम स्मरण, अभिषेक, भजन, महा प्रसादाचे आयोजन केले होते, संपूर्ण मंदिर फुले- फळाने, विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले जाते. संपूर्ण परिसर प्रकाशमय केला होता
दत्त भक्त मंडळाचे अध्यक्ष- सत्यवान घाडीगावकर, चिटणीस-उमेश कानडे व त्याचे पदाधिकारी मोट्या उत्साहात कार्यरत होते. सेवेकरी- वसंत पिसाळ, श्यामराव केरबा, शशिकांत कानडे, सुरेश बागवे, साई हुरळीकर, वसंत पिसाळ, वसुंदरा होडगे, पुर्वा जाधव, कांचन शिंदे, प्रज्ञा गोविलकर, सुनेत्रा वायगणकर यांचा सहभाग मोलाचा होता.
या सोहळ्याला नॅशनल टेक्सटाईल चे अधिकारी, सह ऍड विजय वारंग, अभिषेककुमार सिन्हा, सुनील शिंदे, राम साळगावकर, निवृत्ती देसाई, राजेश कुसळे, बाळ पंडित, राजेन्द्र चव्हाण व सामाजिक-राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.