
आर्थर रोड येथे श्री दत्तजयंती उत्सव !!
मुंबई: चिंचपोकळी (पश्चिम) येथील आर्थर रोड नाका येथे श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराच्या वतीने, बुधवार दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी श्री स्वामी समर्थांच्या मठात, श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
उत्सवाच्या निमित्ताने, पारायण, नामस्मरण, जप, भजन व महाप्रसाद आदीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भक्तांनी उत्सवात सहभागी होऊन स्वामी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराचे अध्यक्ष-बाळ पंडित, सचिव- राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे.